“मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही’; जळगावातून शरद पवारांनी डागली तोफ

जळगाव:-लोकांना आता मोदी नको, हुकूमशाही नको, तर लोकशाही पाहिजे. मोदींची हुकूमशाही राजवट उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. आज जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचा कार्यकर्तां संवाद मेळावा पार पडला. यात ते बोलत होते. शरद पवार म्हणाले की, मी कृषी मंत्री झालो तेव्हा केवळ एक महिन्याचे धान्य शिल्लक होते. मी अस्वस्थ झालो. आमच्या लोकांना खायला नाही. शेतकऱ्याच्या घामाची किंमत मिळाली पाहिजे. मागील काळात आपण शेतीसाठी दिंडी काढली होती. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. देशाला धान्य देणारा शेतकरी आत्महत्या काकरतो? म्हणून मी अस्वस्थ झालो होतो. मागील काळात ६१ हजार कोटींचे कर्ज माफ केले होते.