सामान्य कावीळसाठी नवजात बालकांना “रेफर टू भंडारा’

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- येथील उपजिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ञ व वैद्यकिय अधीक्षकांच्या “निष्काळजीपणा’ मुळे दररोज डझनभर नवजात बालकांना रेफर टू भंडारा पाठवत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सद्या बहुतांश नवजात बालकांना सामान्य कावीळ (पिलिया) होत आहे. शारीरिक नवजात कावीळ च्या उपचारासाठी फोटो थेरपी युनिट सुद्धा या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे फोटोथेरपी हा एक प्रकारचा उपचार आहे जो त्वचेच्या स्थितीवर उपचार करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट ब्लु लाईट प्रकाशाचा वापर करतो आणि नवजात कावीळसाठी सामान्य उपचार आहे. माता नवजात बालक यांची सेवा करणे डॉक्टरांचे आद्यकर्तव्य आहे, या धारणेला तिलांजली देऊन रूग्ण माता कडे व या नवजात बालकांकडे वेळीच लक्ष दिले जात नाही योग्य तापसण्याकरत करीत नाही तर बालकांच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालय भंडारा किंवा खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे बहुतांश कंटाळून परत खासगी रूग्णालयाकडे धाव घेतात.

जे डॉक्टर अश्याप्रकारेसल्ला देतात त्यांचेच खाजगी रुग्णालय येथे असल्याचे बोलले जाते. त्यावरही जे रूग्ण आहेत त्यापैकी अनेक गंभीर रूग्णांना डॉक्टरांचा अभाव, उपकरणांचा अभाव, साहित्याचा तुटवडा दाखवून भंडारा जिल्हा रुग्णालयात रवाना केले जाते. मूल जन्माला घालणे म्हणजे स्त्रीचा दुसरा जन्मच! स्त्री गरोदर राहिल्यापासून ते प्रसूती होईपर्यंत प्रत्येक बाबतीत स्त्रीरोगतज्ज्ञाची भूमिका महत्वाची असते. तर मुलावरील उपचारासाठी बालरोगतज्ज्ञाची नितांत आवश्यकता असते. मात्र उपजिल्हा रुग्णालय विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे माताबालकांचेच आरोग्य धोक्यात असल्याचे उघड आले आहे. येथील प्रभारी वैद्यकिय अधीक्षकबालरोग तज्ज्ञ आहेत हे मात्र विशेष. या रुग्णालयात सर्व सोई सुविधा उपचार उपलब्ध असून सुद्धा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर जर बहुतांश नवजात बालकाच्या नातेवाईकाची दिशाभूल करून भंडारा खाजगी रुग्णालयात रेफर करण्यासाठी नातेवाईकांना सल्ला देत असतील तर अशा डॉक्टरांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सुद्धा नवजात बालकाच्या कुटुंबीयासह नागरिकांनी केली आहे.