जि.प. गणेशपुर येथे शाळापूर्व तयारी मेळावा थाटात साजरा

 दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल, गणेशपुर केंद्र बेला पं. स. भंडारा येथे शाळा पूर्वतयारी मेळावा पहिला मोठया थाटात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून प्रभातफेरी काढून प्रवेशपात्र विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन प्रवेशपात्र विद्यार्थी व त्यांच्या पालकांना निमंत्रण देण्यात आले. व विद्यार्थ्यांना प्रभातफेरी सहभागी करून घेऊन प्रभातफेरी शाळेत आणून विद्यार्थ्यांचे व पालकांचे स्वागत केले. मेळाव्याचे मान्यवर मंडळी यांचे हस्ते रिबीन कापून व माता सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुण उद्घाटन करण्यात आले. मेळाव्याचे महत्त्व शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रास्ताविकातून सर्वांना पटवून दिले. तर कु. रजनी भोंगाडे स. शि. यांनी महिलांना समुपदेशन केले. श्री. बोरकर सर यांनी जि. प. शाळेचे महत्व व सोयीसुविधा विषयी थोडक्यात माहिती सांगितली. सातही स्टॉलवर अंगणवाडी सेविका कारेमोरे, बावनकुळे व लोहबरे तसेच मदतनिस वैशाली मारवाडे, स्वयंसेवक अर्चना जिभकाटे, हिरकन्या मरघडे, प्रणाली बडवाईक, हयांनी विषयनिहाय विद्यार्थ्यांकडून विविध कृति व विद्यार्थीची चाचणी घेतली, तर शेवटच्या ७ व्या स्टॉल वरुन कु. रजनी भोंगाडे स. शि. यांनी माता पालकांना समुपदेशन केले. पालकांना विद्यार्थी व त्यांचा अभ्यासक्रम याविषयी जाणीव जागृती करुन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितिचे अध्यक्ष प्रमोद केसलकर, उपाध्यक्ष सौ. वैशाली मेश्राम, सदस्य सौ. लता पालांदूरकर व सौ. जयश्री भूरे ह्या प्रामुख्याने उपस्थित होत्या.